हर्सूल तलावात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

औरंगाबाद - हर्सूल तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. 15) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मंगळवारी (ता. 14) पासून दोघे बेपत्ता होते. तलावानजीक दुचाकी आढळल्यानंतर ते बुडाल्याचे उघडकीस आले.

औरंगाबाद - हर्सूल तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. 15) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मंगळवारी (ता. 14) पासून दोघे बेपत्ता होते. तलावानजीक दुचाकी आढळल्यानंतर ते बुडाल्याचे उघडकीस आले.

अग्निशामक दलाकडून प्राप्त माहितीनुसार : सूफियान रज्जाकखान (वय 18, रा. किराडपुरा) व समीरखान अकबरखान (वय 20, रा. मिसारवाडी), अशी बुडून मृत झालेल्यांची नावे आहेत. सूफियान बारावीत तर समीरखान बी.ए.चे शिक्षण घेत होता. मंगळवारी (ता. 14) पासून ते दोघे बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाइकांनी शोधाशोध केली, पण त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी जिन्सी पोलिस ठाण्यात दोघे हरवल्याची तक्रार दिली. या प्रकरणी नोंद करून त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. त्यावेळी हर्सूल तलावानजीक दुचाकी, चप्पल व अन्य साहित्य पडलेले काहीजणांना दिसले. त्यांनी ही बाब हर्सूल पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध सुरू केला. त्यानंतर अग्निशामक दलाचे डी. डी. साळुंके, अब्दुल अजीज, एल. पी. कोल्हे, व्ही. आर. निमकर, वाहनचालक अब्दुल हमीद या जवानांनी हर्सूल तलाव गाठला. शोधकार्य हाती घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना घाटीत दाखल केले असता, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात झाली.

तलावाजवळील दुचाकीमुळे उकल
तलावाजवळील दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी मालकाचे नाव माहीत करून घेतले. त्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या दाखल तक्रारीत दुचाकीचा क्रमांक व तलावाजवळ आढळलेल्या दुचाकीचा क्रमांक एकच असल्याने सूफियान व समीरखान यांचा शोध लागला. पण त्यांचा बडून मृत्यू झाला होता.

Web Title: student drawn in harusl lake