विद्यार्थिनींनी न घाबरता तक्रारींसाठी पुढे यावे - डॉ. दीपाली घाडगे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

उस्मानाबाद - अत्याचार व छेडछाडीच्या प्रकरणात विद्यार्थिनींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे, आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर आहोत, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी केले. सोमवारी (ता.आठ) ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मैत्री आमची पोलिसांशी’ या कार्यक्रमात श्रीमती घाडगे बोलत होत्या.

यावेळी प्राचार्य डॉ. शिवानंद पाटील, उपप्राचार्य गीता सपकाळे, प्रा. अतुल अलकुंटे, प्रा. जर्रा काझी यांची उपस्थिती होती. 

मुलींवर वाढत चाललेल्या अत्याचारांमुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याची स्थिती आहे, या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या वतीने ‘मैत्री आमची पोलिसांशी’ हा कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस व तरुणी यांच्यामधील अंतर कमी व्हावे, त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधावा व त्यांच्यात मैत्री निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

‘समाजातील मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, कायदे मुलींच्या बाजूने आहेत; पण तरीही मुली अन्याय का सहन करतात?’ असा प्रश्‍न दीपाली घाडगे यांनी यावेळी उपस्थित केला. आपल्यावर होत असलेल्या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही तक्रारीसाठी पुढे या पोलिस तुमच्याबरोबर आहेत, असा विश्वास यावेळी श्रीमती घाडगे यांनी दिला.

मानसिकदृष्ट्या आपली प्रगती झाल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही. त्यामुळे क्षणिक मोहाला बळी न पडता समाजात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींना दिला.

‘सकाळ’ने मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर हा विधायक कार्यक्रम घेऊन सकारात्मक पत्रकारितेचा वसा जपला आहे, असेही श्रीमती घाडगे म्हणाल्या. भविष्यातही ‘सकाळ’ने महाविद्यालयांमध्ये असे कार्यक्रम घेऊन पोलिस व महाविद्यालयीन तरुणी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

‘सकाळ’ने सामाजिक भान जपले आहे, समाजामध्ये चांगले बदल होण्यासाठी ‘सकाळ’चा प्रयत्न दिशादर्शक असल्याचे प्राचार्य डॉ. शिवानंद पाटील म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. उल्हास सुरवसे यांनी केले.

यिनचे समन्वयक दत्ता माळी यांनी प्रास्ताविक केले. यिनचे जिल्हाध्यक्ष सागर वडवले यांनी आभार मानले.