मुंडेंच्या स्मृतिदिनाचे सुरेश प्रभूंना निमंत्रण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

बीड - गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी तीन जूनला गोपीनाथ गडावर (परळी) होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. 24) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिल्ली येथे भेटून केली. रेल्वेवर आधारित जिल्ह्यात उद्योग आणावेत, अशी मागणीही त्यांनी केली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर आरोग्य शिबिर, अपंगांना साहित्य वाटप, गरजूंना मदत, महिला बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज वाटप, शेतकऱ्यांना मदत आदी सामाजिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आश्‍वासन श्री. प्रभू यांनी दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, परळी- बीड-नगर रेल्वेच्या सध्या सुरू असलेल्या कामाबाबतही या वेळी पंकजा मुंडे व श्री. प्रभू यांच्यात चर्चा झाली. पंकजा मुंडे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज  यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी अमित पालवेही सोबत होते.