घाटीच्या सन्मानजनक मातृत्त्वाची केंद्रीय पथकाकडून पाहणी  

योगेश पायघन
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद : घाटीच्या प्रसुती विभागात होत असलेल्या सन्मानजनक मातृत्वाच्या कामाची राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपायुक्त दिनेश बासवाल, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचे सहाय्यक संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी बुधवारी (ता 30) पाहणी केली.

युनिसेफचे डॉ. खानेंद्रा भुयान, डॉ कानन येळीकर, डॉ श्रीनिवास गडप्पा, डॉ भारत सोनवणे, डॉ. सिंग, डॉ. पगारे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पथकाने प्रसुती विभागाच्या ओपीडी, प्रसूती कक्षाला भेट देत सध्या घेतल्या जाणाऱ्या नोंदी, कामाची पद्धत केंद्रीय घोरणे यासंदर्भात विविध सूचना केल्या. या पाहणी नंतर 'लक्ष' योजनेचे मॉडेल हॉस्पिटल व ट्रेनिंग सेंटर म्हणून घाटीला मान्यता मिळू शकते असे डॉ श्रीनिवास गडप्पा म्हणाले.

Web Title: survey by the central squad of honorable motherhood of the valley