आठ दिवसात गुन्हे मागे घ्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

उमेश वाघमारे
सोमवार, 30 जुलै 2018

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर  दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण  होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधि आणि प्रशासन जबाबदार असेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सोमवारी (ता.30) आयोजित पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  (ता. 1) ऑगस्टपासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येथे बेमुदात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 8 ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. घनसावंगी येथे झालेली दगडफेक ही मराठा समाजातील तरुणांणी केले नाही. पोलिस प्रशासन आणि न्यायदंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर फुटेज चेक करावे, त्यात जर दगडफेक करताना कोणी अढळ्यास त्यावर कारवाई करा. मात्र विनाकारण दाखल केले गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी ही आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Web Title: take back crimes of agitators from maratha kranti morcha