शिक्षक मतदारसंघात चौघा उमेदवारांची माघार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

औरंगाबाद - मराठवाडा शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 20 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी 24 उमेदवारांनी 47 अर्ज दाखल केले होते.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघांसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. या वेळी वैजिनाथ तांबडे, अजमल खान, गजानन वाकळे या तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर गुरुवारी संध्या अनंत काळकर यांनी अर्ज काढून घेतला होता. आता निवडणुकीच्या रिंगणात 20 उमेदवार राहिले आहेत.

निवडणुकीच्या मैदानात विद्यमान आमदार विक्रम काळे, सतीश पत्की, प्रा. गोविंद काळे, व्ही. जी. पवार, संग्राम मोरे, राजेश लोमटे, भालचंद्र येडवे, बालासाहेब उगले, रमेश जाधव, कालिदास माने, विलास जाधव, दिलीप सहस्रबुद्धे, सुनील वाकेकर, इस्माईल तांबोळी, मधुकर उन्हाळे, युनूस पटेल, अंबादास कांबळे, मदन रेनगडे, संजय जाधव, वृंदा नामवाडे यांची उमेदवारी कायम आहे.