उन्हाचा पारा किंचित घसरला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

तापमान आले चाळीसच्या खाली
औरंगाबाद  - ऐन मार्च महिन्यात चाळिशी ओलांडलेल्या पाऱ्याने आता काहीसा दिलासा शहरवासीयांना दिला आहे. गुरुवारी (ता. सहा) औरंगाबाद शहराचे तापमान हे 39.2 एवढे राहिल्याने शहरवासींना उन्हाच्या चटक्‍यांपासून आराम मिळाला.

औरंगाबाद शहराने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेतला होता. त्या काळात तापमापकातील पारा 41 अंशांच्या घरात गेल्याने शहरवासीयांची चांगलीच फजिती झाली होती. मॉन्सूनच्या दृष्टीने ही तापमानवाढ चांगली असली तरी त्याच्या चटक्‍यांना नागरिक बेहाल होते. गुरुवारी (ता.6) मात्र सूर्याने शहराला थोडा आराम दिल्याने पारा किंचित खाली उतरला आहे. गुरुवारी किमान तापमान हे 20.5 तर कमाल तापमान हे 39.2 अंश सेल्सियस राहिले. आगामी दिवसात कमाल तापमानात घसरण अपेक्षित असली तरी किमान तापमान मात्र वाढण्याची शक्‍यता आहे. शनिवारी आणि रविवारी तापमान 38 अंशांपर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत तर किमान तापमान हे 21 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.