दहा वर्षांत जूनमध्ये पावसाची हुलकावणीच

हरी तुगावकर
बुधवार, 13 जुलै 2016

लातूर - राज्यातच नव्हे, तर देशात लातूर जिल्ह्यातील टंचाईचा विषय या वर्षी चर्चेला आला. रेल्वेने पाणी देण्याची वेळ लातूरवर आली; मात्र जिल्ह्याची गेल्या दहा वर्षांची पावसाची आकडेवारी पाहिली तर लातूर जिल्हा किती अवर्षणग्रस्त आहे, हे स्पष्ट होईल. या दहा वर्षांत जूनमध्ये पावसाने हुलकावणीच  दिली आहे. 2005 मध्येच केवळ जूनच्या सरासरीच्या जास्त पाऊस झाला होता. तर पाच वर्षे 100 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीचा पॅटर्नच बदलला गेला आहे.

जुलैअखेरपर्यंत पेरण्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लातूर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यात गेली तीन वर्षे पाऊस कमी झाल्याने लातूर जिल्हा अधिकच चर्चेत आला. लातूरची तहान भागविण्यासाठी "कृष्णे‘ला धावून यावे लागले. मिरजहून रेल्वेने पाणी आणावे लागले आहे. पिण्याची ही अवस्था असल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली. गेली दहा वर्षे पावसाअभावी शेतकऱ्यांचे गणित चुकले आहे. लातूर  जिल्ह्याचा जूनचा सरासरी पाऊस 147 मिलिमीटर आहे. दहा वर्षांत 2007 या वर्षी 277 मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर एकदाही या महिन्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. पाच वर्षे तर 100 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दोन तीन वर्षे कमी, तर एखाद्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचे चक्रच  तयार होत आहे. या वर्षी सरासरीपेक्षा केवळ दहा मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे. चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सहा लाख तीन हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी तीन लाख 64 हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे. जूनच्या सुरवातीच्या पावसानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप
दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. जुलैमध्ये तरी चांगला पाऊस पडेल ही आशा आता शेतकऱ्यांना आहे.

Web Title: Ten years not Rain suficiente rain in June