बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या मदत निधीच्या भरपाईत वाढ

There is an increase in the amount of relief funded who injured in leopard attack
There is an increase in the amount of relief funded who injured in leopard attack

धुळे (म्हसदी) - वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमी झालेल्या व्यक्ती अथवा पाळीव (पशुधन) जनावरांसाठी शासनातर्फे मदत देण्यात येते. या वर्षापासून या मदतीच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसास दहा लाख (पूर्वी ही रक्कम पाच लाख होती) मदत दिली जाणार आहे.

तसेच कायम अपगंत्व आलेल्या व्यक्तीला पाच लाख, गंभीर जखमी व्यक्तीला सव्वा लाख तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना वीस हजार रुपयांची मदतीची मर्यादा आहे, असे आदेश शासनाने काढले आहेत. पशुधन (पाळीव प्राणी) गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किंमतीच्या 75% किंवा चाळीस हजार वा यापैकी कमी असणारी रक्कम, मेढीं, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किंमतीच्या 75% किंवा दहा हजार, तसेच गाय, म्हैस, बैल यांना कायम अपगंत्व आल्यास बाजार भाव किंमतीच्या 50% किंवा बारा हजार व पशुधन जखमी झाल्यास औषधोप्रचारासाठी येणारा खर्च म्हणून चार हजार प्रति जनावर आर्थिक मदत देण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. शिवाय औषधोपचार शासकीय व जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयात करणेस प्राधान्य देण्याचेही शासन निर्णयात म्हटले आहे. वन्यप्राणी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी तीन लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेश व उर्वरीत सात लाख रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यात ठेव रक्कम(एफडी)म्हणून जमा केली जाईल.

  • वन्यपशु बिबट्याची दहशत कायम......!

दरम्यान, धुळे व नदुंरबार जिल्हाभरात वन्यपशु बिबट्याची दहशत सातत्याने वाढत आहे. दुष्काळीस्थितीमुळे पाणी समस्या वर्षभर असते.

वनक्षेत्रे सुरक्षित असल्याने वन्यपशुंचा मुक्त संचार आहे. केवळ भक्ष वा पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर होत आहेत.अन्न,पाण्यासाठी शेतशिवार अथवा गांव कुशीकडे येणारे वन्यपशु पाळीव जनावरांसह माणसांवर हल्ले करतात.

  •  वनप्राणी शोधण्यात अडचणी.....!

वनप्राण्यांच्या हल्ल्यानंतर चौवीस तासात ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती देणे आवश्यक असते. परंतु काही ठिकाणी तसे होताना दिसत नाही. त्यानंतर हल्ल्यातील जखमी रुग्णांलयात असतो. तो कोठे झाला, ती जागा दाखवत नाही. तोपर्यंत पिंजरे लावता येत नाही. अशा अडचणी येतात. पावसाळ्यात लांडगे, तडस पिसळतात. बिबटे रात्री उशिरा बाहेर निघतात. पावसाळा असल्याने वनपशुंचे पायाचे ठसे लवकर पुसले जातात. त्यामुळे प्राणी कोणता होता ते समजत नाही. त्यामुळे वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचण येते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com