फुलंब्रीत चोरट्यांचा धुमाकूळ

नवनाथ इधाटे 
रविवार, 27 मे 2018

फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड शिवारात बैल चोराच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी बैल राखण करणाऱ्या दोघा भावांना मारहाण केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.26) रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. समाधान रंगनाथ पवार (वय 19) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दुसरा अजिनाथ रंगनाथ पवार वय 22 याच्यावर औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड शिवारात बैल चोराच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी बैल राखण करणाऱ्या दोघा भावांना मारहाण केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.26) रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. समाधान रंगनाथ पवार (वय 19) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दुसरा अजिनाथ रंगनाथ पवार वय 22 याच्यावर औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड परिसरातील गट क्रमांक 378  मध्ये रंगनाथ फकिरबा पवार यांची शेतजमीन आहे. त्यांनी या शेतातही बांधकाम केलेले आहे. त्यांच्याकडे दोन बैल असल्याने रात्री दोघे भाऊ नियमित जनावरांची राखनदारी करीत होते. नित्य नियमाप्रमाणे शनिवारी (ता.26) रात्री देखील बांधकाम केलेल्या स्लॅबवर दोघे भाऊ झोपलेले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास कोणीतरी बैल सोडत असल्याची चाहूल या दोघां भावांना लागली. त्यांनी लगेच बैल सोडणाऱ्या चोरांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र येथे कोणीतरी राखण करत असल्याचे बैल चोरांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ स्लॅबवर जाऊन दोघा भावांना जोराची मारहाण केली. या मारहाणीत दोघा भावांनी आरडाओरड केल्याने परिसरातील काही लोक धाऊन आले. मात्र तोपर्यंत समाधान रंगनाथ पवार याला गंभीर मारहाण झाली होती. परिसरातील नागरिक येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. गावकऱ्यांच्या व पोलिसांच्या मदतीना दोघांनाही औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान समाधान रंगनाथ पवार यांची प्राणज्योत मावळली. तर दुसरा भाऊ अजिनाथ रंगनाथ पवार यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 

Web Title: thief in phulambri death of one person