रेल्वे प्रवासी महिलेची सव्वाचार लाखाची बॅग लंपास

A thief was stolen money bag of a railway passenger womans
A thief was stolen money bag of a railway passenger womans

नांदेड : चेन्नई- नगरसोल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या जवळीलरोख व सोन्याच्या दागिण्यासह सव्वाचार लाख रुपये किंमतीची बॅग लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. 23) सकाळी पाचच्या सुमारास मुदखेड रेल्वेस्थानकाजवळ घडली. चोरट्याने चालत्या रेल्वेतून उडी घेऊन धूम ठोकली.
 

सदर महिला ही जालना येथील राहणारी आहे. त्या आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. प्रिया मुकेश ओस्वाल असे त्या महिलेचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरुन नांदेड लोहमार्ग ठाण्यात अनोळखी चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आज लोहमार्ग नागपूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्तराम राठोड हे नांदेडात असतांना ही घटना घडल्याने प्रवाशातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नाली धुतराज या करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com