विचारच व्हर्च्युअल रिऍलिटीचा पाया: विक्रम शर्मा

योगेश पायघन
सोमवार, 11 जून 2018

विचार हा व्हर्चुअल रिऍलिटीचा पाया आहे. वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण, धार्मिक इतिहासासह विविध विषयांतील कल्पनाशक्तींचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी या आभासी जगाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यात युवकांना खूप संधी असल्याचे मत विक्रम शर्मा यांनी व्यक्त केले

औरंगाबाद - विचार हा व्हर्चुअल रिऍलिटीचा पाया आहे. वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण, धार्मिक इतिहासासह विविध विषयांतील कल्पनाशक्तींचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी या आभासी जगाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यात युवकांना खूप संधी असल्याचे मत विक्रम शर्मा यांनी व्यक्त केले.

'यिन' व 'सकाळ'च्या माध्यमातून आयोजित रविवार (ता. 10) पासून सुरू असलेल्या 'समर युथ समिट 2018 'मध्ये सोमवारी (ता. 11) दुपारच्या सत्रात ते बोलत होते. 'व्हर्चुअल रिऍलिटी अँड इट्‌स ऍप्लिकेशन' याविषयीची माहिती त्यांनी 'यिन'च्या सदस्यांना दिली. तसेच माउंट डिव्हाईसच्या माध्यमातून आभासी जगाची ओळख करून दिली. त्यांनी 'सकाळ'च्या माध्यमातून विणलेल्या तरुणाईच्या जाळ्याचे कौतुक केले.
 
पुढे बोलताना विक्रम शर्मा म्हणाले, की 1980 ते 2016 यादरम्यान टेक्‍नॉलॉजी खूप वेगाने विकसित झाली. हेडमाउंट डिव्हाईसचा हा काळ आहे. या गॅझेटच्या माध्यमातून शिक्षणासह विविध आजार दूर करण्यासाठी मदत झाली आहे. अस्तित्वात नसलेल्या वस्तूंत कोणकोणत्या गोष्टी असाव्यात आणि त्या कशा असाव्यात यापुरता या तंत्रज्ञानाचा उपयोग राहिलेला नसून विविध नाविन्यपूर्ण कल्पनांचा आविष्कार होत आहे. सध्या मोजक्‍या कंपन्यांनी लिमिटेड एडिशनमध्ये त्यांचे व्हीआर विकसित केले असले तरी पुढील काळ खूप आशादायी आहे.
 
हे केवळ पाहण्याचे तंत्र नाही. यात करिअर शोधायला पाहिजे. सध्या आम्ही जे काम करतोय, लोक त्याचा उपयोग करीत आहेत. ऑक्‍युलस गो, ऍक्‍टिव्ह व्हीआर, पॅसिव्ह व्हीआर, ऑगमेंटेड रिऍलिटीच्या माध्यमातून सध्याच्या युगापासून तत्काळ दूर घेऊन जाऊन लोकांच्या मनाशी जोडणे शक्‍य आहे. त्यात अनेकदा लोक भावनिक होतात. त्याची अनुभूती विलक्षण असल्याचेही शर्मा यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Thinnk is basis of virtual reality says vikram sharma