पाण्याअभावी हजारो माशांचा तडफडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

जळकोट - तालुक्‍यातील साठवण तलावाचे जलस्रोत उन्हाच्या तीव्रतेसोबत आटत चालले आहेत. त्यामुळे दररोज हजारो मासे तडफडत असून तलावाबाहेर मृत माशांचा खच जमा होत आहे. दरम्यान, मासेमारी व्यवसाय संकटात आला असून मच्छिमार संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

जळकोट - तालुक्‍यातील साठवण तलावाचे जलस्रोत उन्हाच्या तीव्रतेसोबत आटत चालले आहेत. त्यामुळे दररोज हजारो मासे तडफडत असून तलावाबाहेर मृत माशांचा खच जमा होत आहे. दरम्यान, मासेमारी व्यवसाय संकटात आला असून मच्छिमार संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

मच्छिमार संस्थेकडून माशाची पिल्ले टाकण्यासाठी तालुक्‍यातील अनेक साठवण तलाव पैसे भरुन घेतले जातात. यंदा तालुक्‍यात पाऊस कमी झाला. साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. उन्हाच्या तीव्रतेसोबत पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. दुसरीकडे पिण्यासाठीही पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायापुढे संकट निर्माण झाले आहे. 

हाताला लागेल तेवढा माल काढण्यासाठी मच्छिमार व्यावसायिकांची धडपड चालू आहे. भल्या सकाळीच मच्छिमार व्यावसायिक साठवण तलावावर येत असून सायंकाळपर्यंत त्यांचा मुक्काम येथेच आहे. 

दररोज एक ट्रक माल निघत आहे. हा माल कोणत्या बाजारात विक्री करावा, असा प्रश्‍न मच्छिमार संस्थेला पडला आहे. सध्या निघालेला माल नांदेड, कंधार, मुखेड येथील बाजारात मिळेल त्या भावाने विक्री केला जात आहे. अशा परिस्थितीमुळे मच्छिमार संस्थेचा भांडवल खर्चही निघत नाही. 

लाखो रुपये खर्च करून माशाची पिल्ले तलावात टाकली होती. मासे मोठे होत असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून साठवण तलावातील पाणी कमी होत आहे. साठवण तलावातील मासे बाहेर पडून मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. 
- जीवन गायकवाड,  चेअरमन, मच्छिमार संस्था 

Web Title: Thousands of fishes die due to water