हजारो क्‍विंटल तुरीची आवक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

जालना - मागील आठवड्यापासून जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तुरीची हजारो क्विंटल आवक झाली आहे. सोमवार (ता. 26) ते बुधवार (ता. एक) या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात नाफेडतर्फे सात हजार 559.17 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये जालना येथे पाच हजार 247.12 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. जालना येथील केंद्रावर हजारो क्विंटल तूर आलेली आहे, मात्र येथे केवळ पाच काटे आणि चाळण्यांवर तुरीची खरेदी सुरू आहे. 

नाफेडने जिल्ह्यामध्ये जालना, परतूर आणि अंबड या तीन ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. त्यांतील जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर मागील आठवड्यामध्ये तुरीची आवक भरमसाट झाली. तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून बुधवारपर्यंत (ता. एक) जिल्ह्यामधील तीन हजार 940 शेतकऱ्यांची नाफेडने 62 हजार 133.43 क्विंटल तूर खरेदी केली आहे. यात जालना येथील केंद्रावर दोन हजार 976 शेतकऱ्यांची 48 हजार 576.12 क्विंटल, परतूर येथील केंद्रावर 788 शेतकऱ्यांची 10 हजार 690.48 क्विंटल, अंबड येथील केंद्रावर 174 शेतकऱ्यांची दोन हजार 857.34 क्विंटल तर अंबड येथील एफसीआयमार्फत दोन शेतकऱ्यांची 15.49 तूर खरेदी केली आहे. 

यामध्ये सोमवार (ता. 27) ते बुधवारपर्यंत जालना बाजार समिती येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पाच हजार 247.12, परतूर येथील केंद्रावर एक हजार 251.57 तर अंबड येथील केंद्रावर एक हजार 66.78 क्विंटल तूर खरेदी केली आहे. 

Web Title: Thousands of quintals of tur

टॅग्स