संकेत कुलकर्णी खून प्रकरणातील तीन आरोपींचा जामीन फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

औरंगाबाद - एकतर्फी प्रेमातून तरुणाचा चारचाकी गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणातील तीन आरोपींचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला. 

औरंगाबाद - एकतर्फी प्रेमातून तरुणाचा चारचाकी गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणातील तीन आरोपींचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला. 

प्रकरणातील आरोपी उमर अफसर पटेल (रा. देवळाई चौक), विजय नारायण जोग (रा. बाळापूर, देवळाई) आणि संकेत संजय मचे (रा. हरिकृपानगर, देवळाई चौक) या तिघांना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या तिघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. जामिनाला विरोध करताना जिल्हा सरकारी वकील ऍड. अविनाश देशपांडे यांनी सदर खून हा थंड डोक्‍याने केलेला असून न्यायालयीन कोठडीदरम्यान आरोपींनी साक्षीदारांना धमकी देऊन दहशत निर्माण केल्याने या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत जामीन न देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन फेटाळला. 

Web Title: Three accused in Sankh Kulkarni murder case rejected the bail