तीन शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

औरंगाबाद - नापिकी आणि कर्जबाजारीच्या कारणावरून मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात एका शेतकरी महिलेचा समावेश आहे. कोळवाडी (जि. लातूर) येथील शेतकरी इंद्रजित ज्ञानोबा तांदळे (वय 41) यांनी शुक्रवारी रात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेसह खासगी कर्ज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. धानोरा (जि. नांदेड) येथील शेतकरी नामदेव मारुती माटोरे (वय 50) यांनी काल घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नापिकीसह खासगी कर्जाचा ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. नापिकीला कंटाळून केसापूर (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील शेतकरी राधाबाई किसन खंदारे (वय 50) यांनी गुरुवारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
Web Title: three farmer suicide in marathwada