तुळजाभवानीला अर्पण केलेले नारळ दोन रुपयांना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

तुळजापूर - तुळजाभवानी देवस्थान समितीने भाविकांनी अर्पण केलेला नारळ अवघ्या दोन रुपयांस विक्री करण्यास सुरवात केली आहे. मंदिरात वाढलेल्या नारळाच्या संख्येमुळे मंदिर समितीला वरील निर्णय घेणे भाग पडले आहे.

भाविक तुळजाभवानी मातेस खणा-नारळाने ओटी भरतात, त्यानंतर ते नारळ मंदिरात जमा होतात. तुळजाभवानी मंदिरात 2015-16 या वर्षात कंत्राटदाराने नारळ ठेक्‍याने घेण्यास नकार दिल्याने मंदिरात नारळ साठत आहेत. नारळांनी मंदिरातील चार खोल्या भरलेल्या आहेत. तसेच मंदिराच्या स्टेडियमखाली नारळ साठलेले आहेत. अखेर मंदिर समितीने दोन रुपयांस एक नारळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान 10 नारळ खरेदी करणे अनिवार्य ठेवण्यात आलेले आहे.

Web Title: tuljabhavani prasad coconut only 2rs in tuljapur

टॅग्स