तुळजापूर यात्रेसाठी तेराशे जादा बस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

तुळजापूर - तुळजाभवानी मातेची गुरुवारी (ता. 5) अश्विन पौर्णिमा यात्रा असून, भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) एक हजार 350 जादा बसची व्यवस्था केली आहे.

तुळजापूर - तुळजाभवानी मातेची गुरुवारी (ता. 5) अश्विन पौर्णिमा यात्रा असून, भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) एक हजार 350 जादा बसची व्यवस्था केली आहे.

या नियोजनात उस्मानाबाद विभागातर्फे 350, तर नगर विभागातर्फे 50 बसचा समावेश असेल. बीड, लातूर विभागाने प्रत्येकी 150 बसची सोय केली आहे. लातूर रस्त्यावरून येणाऱ्या बससाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात थांबण्याची सोय आहे. नव्या स्थानकावर सोलापूरकडे जाणाऱ्या, तर जुन्या स्थानकावरून उस्मानाबादकडे, जुन्या स्थानकासमोरील गोडाऊनमध्ये कर्नाटक भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसची सोय करण्यात आली आहे. यंदा प्रथमच तहसील कार्यालयाच्या गोदामाजवळ मराराष्ट्रासह कर्नाटकातील बस उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अश्विन पौर्णिमेनिमित्त कर्नाटकातील गुलबर्गा, हुमनाबाद, विजापूर, इंडी, आंध्र प्रदेशातील हैदराबाद, जहिराबाद या भागांतील भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. सोलापूर येथून भाविक पायी येतात आणि बसने परततात.

तुळजाभवानी मातेच्या अश्विन पौर्णिमा यात्रेसाठी 1350 जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नळदुर्ग रस्त्यावरील हेलिपॅडजवळ जादा बस थांबण्याची सोय केली आहे.
- मुरलीधर जाधव, आगारप्रमुख, तुळजापूर

Web Title: tuljapur news 1300 extra bus for tuljapur yatra