तुळजाभवानी मातेसह यमाई, हिंगळाई देवीची मंदिरे प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

तुळजापूर - श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरात तुळजाभवानी मातेसह अन्य दहा देवीची मंदिरे आहेत. तुळजाभवानी मंदिराप्रमाणे या अन्य देवी स्थानांनाही मोठे महत्त्व आहे.

तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेसह यमाई देवीचेही मंदिर आहे. या ठिकाणी यमाई देवीचा तांदळा आहे. प्राचीन काळात या देवीचे मंदिर उत्तराभिमुख होते. विकास आराखड्यात ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. पौष महिन्यात यमाई देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

शहरातील भारतीबुवा मठामध्ये देवीचे स्थान असून, तेथून देवीस दररोज सकाळी व सायंकाळी बोलाविण्याची प्रथा आहे.

तुळजापूर (खुर्द) येथे असणाऱ्या देवीची मूर्ती शेतात काम करताना सापडली होती. या मूर्तीवर चंद्रात्र गोत्राचा उल्लेख आहे. शहरातील गरीबनाथ मठात असणाऱ्या हिंगळाई देवीची मूर्ती असून, नाथसांप्रादायिक मठ आहे. या ठिकाणी विविध धार्मिक विधी होतात. येथील महाद्वार रस्त्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. तर पापनास येथे इंद्रायणी देवीचे मंदिर आहे. डोंगरमाथ्यावर हे मंदिर वसलेले आहे. शहरात उत्तर बाजूस रामवरदायिनी देवीचे मंदिर असून पूर्णतः पाषाणी दगडात मंदिर आहे. देवीच्या हातात अनेक आयुधे आहेत. तुकोजीबुवा मठात आणि चिलोजीबुवा मठात दोन अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती आहेत. गोमाजी वाड्यात रेणुकामातेचा तांदळा असून, पौष महिन्यात देवीचा उत्सव असतो. 

शहरातील देवींची सर्व स्थाने प्राचीन आहेत. सर्व देवीस्थाने महत्त्वाची असून, रामवरदायिनी देवीने श्रीरामास वर दिला असल्याची आख्यायिका आहे.
- दशरथ पुजारी, रामवरदायिनी देवीचे पुजारी.

Web Title: tuljapur news tuljabhavani mata mandir