केंद्रावर अडकलेल्या तुरीची आजपासून खरेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

लातूर - आधारभूत किंमत योजनेत लातूर जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत आलेल्या सोळा हजार क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी उद्यापासून (ता. 3) होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बाजार हस्तक्षेप योजनेत केंद्रावरील तुरीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी मंगळवारी सायंकाळी तूर खरेदीस मान्यता दिली. हमीभावानेच खरेदी होणार असून, याचा लातूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.