जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रे 15 मार्चपर्यंत सुरू राहणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

लातूर - जिल्ह्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली खरेदी केंद्रे ता. 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी दिली. 

लातूर - जिल्ह्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली खरेदी केंद्रे ता. 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी दिली. 

केंद्र शासनाने तूर खरेदीकरिता 90 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला आहे. त्यामुळे तुरीची खरेदी ता. 15 मार्चपर्यंत केली जाणार आहे. तूर खरेदीच्या अनुषंगाने ता. 22 फेब्रुवारी रोजी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीत नाफेड, भारतीय अन्न महामंडळ, वखार महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे तूर खरेदीत वाढ होत आहे. तूर खरेदीकरिता आवश्‍यक असणारा बारदाना, तसेच साठवणुकीसाठी आवश्‍यक असणारी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. 

केंद्र शासनाच्या आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था यांची गोदामे प्राधान्याने तूर साठवणुकीसाठी भाड्याने घ्यावीत अशा सूचना आहेत. तूर खरेदी ता. 15 मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याने खरेदी केंद्रावर एकाच वेळी गर्दी करू नये, असे आवाहन श्री. सुमठाणे यांनी केले आहे. 

Web Title: Tur shopping centers in the district will continue till March 15