शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

कळमनुरी (जि. हिंगोली) -  पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. शहरालगत दत्त मंदिर परिसरात शेततळे आहे. आज दुपारी मुश्‍तहिद मुजीब पठाण (वय 13, कापसे गल्ली), शेख आदिल शेख हारुण (13, नवी आबादी) हे मित्रांसोबत पोहण्यासाठी तेथे गेले होते. पाण्यात उडी मारल्यावर मुश्‍तहिद पठाण व शेख आदिल तळ्यामध्ये फसले. त्यांच्या मित्रांनी ही बाब घरच्यांना कळवली. त्यानंतर सुमारे पंचवीस युवकांनी तळ्यात उतरून दोघांचा शोध सुरू केला. सायंकाळी सातच्या सुमारास मुश्‍ताहिद व शेख आदिल यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे दोघे गुलाम नबी आझाद उर्दू शाळेत आठवीत शिकत होते. 

टॅग्स