परभणीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांचा बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

जिंतूरसारख्या ठिकाणी जाण्यास अधिकारी धजावत नव्हते. तिथे यशस्वी कामगिरी बजवाल्यानंतर श्रीनिवास महादेवराव अर्जून यांना परभणी उपविभाग देण्यात आला होता.

परभणी : जिल्ह्यातील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच इतर विभागांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. अद्याप त्यांच्या पदस्थापना झालेल्या नाहीत.

दोन वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी श्रीनिवास महादेवराव अर्जून या जिल्ह्यात आले होते. सुरवातीला त्यांना जिंतूर येथील उपविभागीय अधिकारीपदाची जबाबदारी दिली होती. आधीच जिंतूरसारख्या ठिकाणी जाण्यास अधिकारी धजावत नव्हते. तिथे यशस्वी कामगिरी बजवाल्यानंतर त्यांना परभणी उपविभाग देण्यात आला. त्याला सहा महिनेही लोटले नव्हते.

दरम्यान, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली होती. ही आटोपताच त्यांची नाशिक विभागात बदली झाली आहे. त्यांना पदस्थापना दिली नसल्याने ते कोणत्या जिल्ह्यात गेले, हे निश्चित नाही. दुसरीकडे गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी गौरी सावंत यांची अमरावती विभागात बदली झाली आहे. त्यांना देखील पदस्थापना देण्यात आली नाही.