नांदेड- जालना रोडवर अपघात, दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

कारमधील सत्यनारायण भक्कड (वय ५०), अनिता भक्कड (वय ४५) (रा. जालना) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

औंढा नागनाथ : येथे येळी पाटीजवळील नांदेड- जालना रोडवर कार व इंडियन गॅसच्या गाडीचा रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला आहे. यात कारमधील सत्यनारायण भक्कड (वय ५०), अनिता भक्कड (वय ४५) (रा. जालना) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याशिवाय, अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला नांदेड येथे हालवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती कळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवसेना संपर्क प्रमुख पांडूरंग नागरे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने इतर ४ जनांना औंढा नागनाथ ग्रामीन रूग्नालयात हलविले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले.