कळंब येथे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कळंब - पावसाने पाठ फिरविल्यामुळे पीक वाळून जाऊ लागल्याच्या नैराश्‍यातून कळंब तालुक्‍यात सोमवारी (ता. 6) सकाळी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बरमाचीवाडी येथील शेतकरी महादेव मनोहर बाराखोते (वय 25) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी सोयाबीन व अन्य पिके घेतली आहेत. मात्र, पावसाअभावी सोयाबीन हातातून जाणार या भीतीपोटी महादेव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सातेफळ येथील शेतकरी सुब्राव लिंबा वाघमारे (75) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची सातेफळ शिवारात 97 आर शेतजमीन आहे.
Web Title: two farmer suicide