भाच्याला वाचविताना मामा वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

माजलगाव (जि. बीड) - कालव्यात पडलेल्या भाच्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मामा वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. पात्रूड येथील मोमीन तय्यब रज्जाक (वय 21) व त्याची आई, भाचा तारेक मोमीन हे धुणे धुण्यासाठी पात्रूड गावाजवळून गेलेल्या कालव्यावर गेले होते. परंतु धुणे धूत असताना भाचा तारेकचा पाय निसटून तो कालव्यात पडला.

मोमीन तय्यब याने कालव्यात उडी घेऊन तारेकला बाहेर काढले; मात्र तय्यबला कालव्याबाहेर येता आले नाही, तो कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, माजलगाव धरणातून कालव्यातील मोमीन तय्यबचा शोध लागावा, यासाठी पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला होता.