पोलिसाने घातली निरीक्षकाच्या दालनात दुचाकी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

बीड - येथील पोलिस मुख्यालयात एका पोलिस कर्मचाऱ्याने राखीव पोलिस निरीक्षकांच्या दालनात दुचाकी घालून त्यांना शिवीगाळ करीत धमकावले. यावेळी सहायक महिला फौजदार समजावून सांगण्यासाठी पुढे सरसावल्या तेव्हा त्यांच्याबद्दल अश्‍लील शब्दप्रयोग वापरले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या बहीण-भावाविरुद्ध शुक्रवारी (ता. 20) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिद्धांत गोरे व रेखा गोरे अशी गुन्हा नोंद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिलला रात्री नऊला राखीव पोलिस निरीक्षक शेख गफ्फार हे आपल्या दालनात कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होते. या वेळी पोलिस कॉन्स्टेबल सिद्धांत गोरे दुचाकीसह थेट शेख यांच्या दालनात घुसले. यानंतर एकच गोंधळ उडाला. शेख यांनी त्यांना जाब विचारला, तेव्हा सिद्धांत यांनी त्यांना शिवीगाळ करून धमक्‍याही दिल्या. दरम्यान, एक सहायक महिला फौजदार सिद्धांत यांना समजावून सांगण्यासाठी सरसावल्या असता गोरे यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. या वेळी सिद्धांत यांच्या बहिणीने (रेखा गोरे) यांनीही गैरवर्तन केले. याबाबत निरीक्षक शेख गफ्फार यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. शुक्रवारी त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात पोलिस कर्मचारी असलेल्या बहीण-भावाविरुद्ध शिवीगाळ, धमकी, विनयभंग, शासकीय कामकाजात अडथळा आणणे या कमलांखाली गुन्हा नोंद करण्यात आला. गोरे बंधू-भगिनीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

वरिष्ठांविरुद्ध ऍट्रॉसिटीची तक्रार 
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिस कर्मचारी सिद्धांत गोरे व रेखा गोरे यांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याचा तक्रार अर्ज दिला आहे. हा अर्ज पोलिस प्रशासनाने चौकशीवर ठेवला आहे. 

अधीक्षकांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज 
सदरील प्रकाराची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. शिवाय सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यावेळी उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्‍याम पाळवदे आदी सोबत होते. 

Web Title: two-wheeler in Inspector's room