चनई परिसरात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

अंबाजोगाई - चनई (ता. अंबाजोगाई) येथे सोमवारी (ता. 22) दुपारी कपडे धुण्यासाठी गेलेली मुलगी तलावात पाय घसरून पडली. तिला वाचविण्यास गेलेला युवकही त्यात बुडाल्याने या दोघांचाही या वेळी मृत्यू झाला.

अंबाजोगाई - चनई (ता. अंबाजोगाई) येथे सोमवारी (ता. 22) दुपारी कपडे धुण्यासाठी गेलेली मुलगी तलावात पाय घसरून पडली. तिला वाचविण्यास गेलेला युवकही त्यात बुडाल्याने या दोघांचाही या वेळी मृत्यू झाला.

निकिता घनघाव (वय 14) ही मुलगी तिच्या आईसोबत गावाजवळच असलेल्या खोपरनाथ तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. या वेळी ती पाय घसरून तलावात पडली. तेथे असलेला देवकुमार सुभाष लोंढे (वय 22) हा युवक कपडे घेऊन घरी निघाला होता. निकिता तलावात पडल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी देवकुमारने तलावात उडी घेतली; परंतु त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

टॅग्स