टंकलेखन यंत्राचा खडखडाट होणार आता कायमचा बंद

संजय बर्दापूरे
मंगळवार, 23 मे 2017

काळानूसार टाईपरायटर ईंग्रजांच्या काळापासून आले होते. आता संगणकाचा वापर होत असल्याने संगणकावर पूढील टाईपींगची परिक्षा होईल
-गोवर्धन विरकुंवर, राज्य उपाध्यक्ष, टाईपरायटींग संस्थाचालक महासंघ.

या वर्षी टंकलेखन यंत्रावरील शेवटची परिक्षा; शासनमान्य कॉम्प्युटर अभ्यासक्रम लागू

वसमत: लाखो सुशिक्षीत बेरोजगार तरूण-तरूणींना माध्यमिक शिक्षणानंतर नौकरीची व व्यावसायाची संधी मिळवून देणाऱ्या टंकलेखनाची खडखडाट आगामी काळात कायमची बंद होणार आहे. शासन धोरणाप्रमाणे कॉम्प्युटर-टायपिंग युगाची सुरूवात झाल्याने शासननिर्मित्त नविन कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रम कोर्स शासनमान्य टायपिंग संस्थांना लागू करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मागील कित्येक वर्षापासून टंकलेखन अभ्यासक्रम गोरगरीब व होतकरू तरूणांसाठी संजीवणी ठरलेले आहे. दहावी व बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व इतर कारणांमुळे उच्च शिक्षण मिळत नव्हते. अशावेळी कमीत कमी शिक्षण असतानाही व्यावसायाची व नौकरीची संधी प्राप्त करून देणारा अभ्यासक्रम म्हणजे टंकलेखन अभ्यासक्रम सर्वसमावेशन होता. मात्र, काळानुसार संगणकाचे युग आल्याने पारंपररिक असलेली व लाखो तरूण तरूणींना नौकरीची व व्यावसायाची संधी मिळवून देणाऱ्या टंकलेखन अभ्यासक्रमाला संगणाकाची स्पर्धा मिळाली. त्यामुळे टाकलेखन अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संगणकाचा अभ्यासक्रम करणे क्रमप्राप्त झाले होते.

तसेच मॅन्युअल टायपिंग कोर्स केल्यानंतरही त्याच विद्यार्थ्यांला कॉम्प्युटरचे ज्ञान मिळविण्यासाठी दुहेरी आर्थिक भुर्दंड पडत  होता. यामुळे हजारो विद्यार्थ्यांसह टंकलेखन व्यावसायिकही अडचणीत आले होते. याचा सारासार विचार करून मॅन्युअर टायपिंग यंत्र व कॉम्प्युटर सिस्टिम यांचा योग्य समन्वय ठेवून शासनाने शासननिर्मित कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रम कोर्स ( जी.सी.सी -टी.बी.सी.) शासनमान्य टायपिंग संस्थांना लागू केला आहे. या नविन अभ्यासक्रमामध्ये वर्ड, एक्‍सल, पीपीटी, लेटर, स्टेटमेंट, स्पिड, पॅरेग्राफ आदीचा समावेश आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये होणारी मॅन्युअल टायपिंग परिक्षा ही शेवटची मॅन्युअल परिक्षा राहणार असल्याने वर्षानुवर्षाचा टाकलेखनाचा खडखडाट आता बंद होणार आहे.


लाखो विद्यार्थी दरवर्षी मॅन्युअल अभ्यासक्रमाची परिक्षा पास होत. या प्रमाणपत्राच्या अधारे शासकीय व इतर ठिकाणी शासनसेवेला भरती होत होते. परंतू ज्या ठिकाणी ते प्रत्यक्ष प्रशासनिक काम करीत त्या ठिकाणी टंकलेखन यंत्र नाहीत संगणक असल्याने त्यांची मोठी अडचण होत होती. आता शासननिर्मित कॉम्प्युटर अभ्यासक्रम आल्याने व तो संस्थांना लागू करण्यात आल्याने विद्यार्थी व व्यावसायिकांची सोय झाली आहे.
- चंद्रशेखर नल्लेवार, संचालक विधाता टायपिंग इन्स्टिट्यूट, वसमत.