खुलताबाद तालुक्‍यात 'नोटा'चा तब्बल 1345 मतदारांकडून वापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

नुकत्याच संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत खुलताबाद तालुक्‍यातील 1345 मतदारांनी "नोटा'चा वापर करीत मतदानाचा हक्क वापरला.

टाकळी राजेराय - नुकत्याच संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत खुलताबाद तालुक्‍यातील 1345 मतदारांनी "नोटा'चा वापर करीत मतदानाचा हक्क वापरला.

तालुक्‍यातील बाजार सावंगी, गदाणा, वेरूळ या तीन जिल्हा परिषद गटांसह बाजार सावंगी, टाकळी राजेराय, गदाणा, ताजनापूर, वेरूळ, गल्ले बोरगाव या सहा पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणात नकारार्थी मतांचा वापर करण्यात आला. यात जिल्हा परिषदेच्या तीन गटात 692, पंचायत समितीच्या सहा गणांत 653 मतदारांनी उमेदवारांना नाकारले.

यात जिल्हा परिषदेसाठी बाजारसावंगी व गदाणा गटात प्रत्येकी 257, वेरूळ गटात 178 मते नकारार्थी आली. पंचायत समितीच्या गल्लेबोरगाव गणात सर्वाधिक 180, वेरूळ गणात सर्वात कमी 78 मते नकारार्थी पडली. टाकळी राजेराय, ताजनापूर गणात 91, बाजारसावंगी गणात 120, गदाणा गणात 93 मतदारांनी नकारार्थी मतदान करून उमेदवारांना नाकारले.