कळंबमध्ये मुख्याध्यापकाची आत्महत्या

दिलीप गंभीरे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

आॅनलाईन कामामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे शिक्षकावरील तणावाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी, आईवडील आहेत

कळंब(जि. उस्मानाबाद) - जिल्हा परिषद प्रशाला मस्सा (खं) (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथिल मुख्याध्यापक  राधाकिशन राम बनसोडे (वय ४०) यांनी आज (गुरुवार) पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आॅनलाईन कामामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे शिक्षकावरील तणावाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी, आईवडील आहेत.