मोगल साम्राज्यात संत एकनाथ महाराजांनी वासुदेव पंथ उभारला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

वासुदेव मनोहर करक यांची माहिती : साडेसातशे वर्षांची परंपरा 

फुलंब्री - मोगल साम्राज्यात मराठी धर्माच्या माणसांना एकमेकांना बोलण्यावर बंदी होती. मराठी धर्म टिकवून ठेवण्यासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराजांनी वासुदेव पंथाची निर्मिती करून समाजात जनजागृती करण्याचे काम वासुदेव पंथाकडे सोपविले असल्याची माहिती वासुदेव मनोहर कटक यांनी शुक्रवारी (ता.१९) दिली. 

वासुदेव मनोहर करक यांची माहिती : साडेसातशे वर्षांची परंपरा 

फुलंब्री - मोगल साम्राज्यात मराठी धर्माच्या माणसांना एकमेकांना बोलण्यावर बंदी होती. मराठी धर्म टिकवून ठेवण्यासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराजांनी वासुदेव पंथाची निर्मिती करून समाजात जनजागृती करण्याचे काम वासुदेव पंथाकडे सोपविले असल्याची माहिती वासुदेव मनोहर कटक यांनी शुक्रवारी (ता.१९) दिली. 

मोगल साम्राज्यापासून वासुदेवांची परंपरा सुरू आहे. त्यामुळे सुमारे साडेसातशे वर्षांपासून मराठी धर्मात जनजागृती करण्याचे काम वासुदेव करीत आहे. आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी शेलगाव खुर्द (ता.फुलंब्री) येथे सकाळीच घरोघरी वासुदेवांचे भजन कानोकानी गुंजत होते. वासुदेवाशी सकाळच्या बातमीदाराने चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना कटक वासुदेव म्हणाले की, मोगल साम्राज्यात संत एकनाथ महाराजांनी वासुदेव धर्म उभारून वासुदेव समाजाची धर्म प्रचारासाठी तयारी करून घेतली आणि मोगल साम्राज्याविरुद्ध धर्मप्रचार करून लढा उभारला. मोगल साम्राज्य मराठी धर्माच्या लोकांना एकमेंकांना भेटू देत नव्हते, बसू देत नव्हते, एकत्रित लोकांचा मोगल साम्राज्य छळ करीत होते. वासुदेव पंथांनी धर्मप्रचार केला आणि मोगल साम्राज्याविरुद्ध लढा दिला. त्यामुळेच मराठी धर्मातील लोक आज एकमेकांना भेटू शकतात, बोलू शकतात, सर्व काही स्वतंत्रपणे करू शकतात. संत एकनाथ महाराजांचा संदेश घरोघर पोचविण्याचे काम वासुदेवाने केले आहे. त्यामुळे वासुदेव पंथासाठी शासनानेही विशेष सवलती अंमलात आणाव्यात, अशी मागणी समस्त वासुदेव पंथ करीत आहे. 

पूर्वीचे लोक दान स्वरूपात वासुदेवांना तांब्या पितळेचे भांडे, गाई-वासरे, कटकीचे खण, जुन्या नाट्या देत असत. परंतु आताच्या आधुनिक युगात फक्त वस्त्रदानावरच वासुदेवांना उदारनिर्वाह भागावा लागत आहे. दिवसेंदिवस वासुदेवांकडे दुर्लक्ष होत असल्याने वासुदेव पंथ लुपत होत चालला आहे. त्यामुळे वासुदेव पंथाची वेळीच सुधारणा करणे काळाची गरज बनली आहे.

वासुदेवांच्या टोपचे रहस्य
दिवाळी-दसरा सणाच्या काळात मोर नाचत पिसार फुलवित असतात. त्यामुळे जुने पिसारे गळून नवीन पिसारे मोरांना येत असतात. मोरांचे तेच गळालेले पिसारे वापरून वासुदेव आपल्या टोपाची निर्मिती करीत असतात. या टोपात बांबूच्या कमट्या, सुती धागा, नाथांचा  कळस, मोर पिसारे, तुळशीची माळ, भगवा कपडा आदी वापरून टोप निर्माण केला जातो. आणि या टोपवरच वासुदेव पंथ आपला उदारनिर्वाह भागवत असतो.