विधी विद्यापीठाचे कुलगुरू 16 मार्चला सूत्रे स्वीकारणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

औरंगाबाद - औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश हे 16 मार्चला कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. "क्‍लॅट'च्या यादीतील समावेशाबाबत तातडीने पावले उचलली जाणार असून, जून 2017 पासून वर्ग सुरू होणार आहेत.

औरंगाबाद - औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश हे 16 मार्चला कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. "क्‍लॅट'च्या यादीतील समावेशाबाबत तातडीने पावले उचलली जाणार असून, जून 2017 पासून वर्ग सुरू होणार आहेत.

शासकीय अध्यापक महाविद्यालयात शनिवारी (ता. चार) उच्चशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश, सहसचिव सिद्धार्थ खरात, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे आदी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर विधी विद्यापीठासाठी ठरविलेली प्रशासकीय इमारत, शिकवणी वर्ग, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांची पाहणी करण्यात आली.

पाटणा येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाकडे "क्‍लॅट'च्या समन्वयाचे काम आहे. कुलगुरू पदभार घेतल्यानंतर ते समन्वयकांशी बोलून त्या यादीत औरंगाबाद विद्यापीठाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या वर्षाचे जून-जुलै 2017-18 पासून विधी विद्यापीठाचे वर्ग सुरू होणार आहेत. बीए-एलएलबी ऑनर्स हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून, पहिल्या वर्षाचे प्रवेश करण्यात येतील. प्रवेश क्षमता 60 विद्यार्थ्यांची असेल. क्‍लॅटच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेशित होतील.

जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनवणार - डॉ. सूर्यप्रकाश
येत्या पाच वर्षांत वर्ल्ड क्‍लास युनिव्हर्सिटी बनविण्याचा मानस आहे. यात ऍकॅडमिकवर भर देण्यात येईल; तसेच दोन वर्षांत हा कॅंपस्‌ दोन वर्षांत नव्या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न राहील.