झोका खेळताना भिंत कोसळली; बहीण-भाऊ ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

दुसरी बहीण जखमी, इतर दोन भावंडे बालंबाल बचावली, रांजणगाव येथील घटना 

वाळूज - झोका खेळताना पाच भावंडांच्या अंगावर भिंत पडून दोन बहीण-भावाचा मृत्यू झाला; तर त्यांची एक बहीण जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. २०) दुपारी एकच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. यात त्यांच्या इतर दोन बहिणी बालंबाल बचावल्या. मुंजाजी सुरेश घाटगिळे (१२) आणि रमा सुरेश घाटगिळे (६) अशी मृतांची नावे आहेत.

परभणी जिल्ह्यातील गोपा (ता. गंगाखेड) येथील सुरेश भानुदास घाटगिळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह रांजणगावातील दत्तनगरामध्ये शब्बीर अमीनखान पठाण यांच्या खोलीत चार वर्षांपासून भाड्याने राहतात. त्यांना एक मुलगा व चार मुली अशी पाच अपत्ये आहेत. पठाण यांच्या दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर घाटगिळे राहत असून, वरच्या मजल्यावरील एक खोली रिकामी आहे. त्यामुळे रविवारी दुपारी घाटगिळे यांची पाचही मुले वरच्या खोलीत साडीचा झोका बांधून खेळत होती. मुलांनी झोक्‍याचे एक टोक खोलीच्या खिडकीला व दुसरे टोक घरातील भांडे ठेवण्यासाठी बांधलेल्या सातफुटी फडताळ्याला (भिंतीतील कपाट) बांधले होते. झोक्‍यामुळे हादरा बसून फडताळ्याची भिंत मुलांच्या अंगावर पडली. यात मुंजाजी आणि रमा ही भावंडे जागीच ठार झाली तर श्रद्धा (८) नावाची त्यांची अन्य बहीण जखमी झाली. या घटनेत सरगम सुरेश घाटगिळे (१०) व संध्या सुरेश घाटगिळे (४) या मुली बालंबाल बचावल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, अमोल देशमुख, हेडकॉन्स्टेबल जी. के. कोंडके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Web Title: waluj marathwada news brother & sister death by wall colapse