पाणी पिण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

Warkari rush due to driking water
Warkari rush due to driking water

नांदेड - विठु माऊलीच्या नावाचा जयघोष करीत निघालेल्या वारी इतकाच भक्तिपूर्ण वातावरणात ‘साईप्रसाद’चे स्वयंसेवक शुद्ध पिण्याचे पाणी मोफत वाटप करीत आहेत. पालखी मार्गावर दररोज 40 हजार लिटर पाण्याचे वाटप स्वयंसेवक ऊन, पाऊस आणि वाऱ्याची पर्वा न करता अखंडित करीत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपुर संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्‍गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो विठुभक्त या पायी वारीमध्ये सहभागी होतात.

शेतीची मशागतीची कामे आटोपलेली असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने या पालखी
सोहळ्यामध्ये सहभागी होतात. दरम्यान पालखी मार्गावर अनेक दानशुरांकडून अल्पोपहाराचे वाटप करतात. परंतु, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप होत नव्हते. परिणामी, वारी दरम्यान आजारी पडण्याचे प्रमाण वारकऱ्यांमध्ये जास्त होते. हे ‘साईप्रसाद’च्या लक्षात आले. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर दोन वर्षांपूर्वी शुद्ध पाणी वाटपाचा कार्यक्रम साईप्रसादने राबवला. यंदाचे हे तिसरे वर्ष असून, सुमारे पालखीमार्गावर दोन आणि दर्शन रांगेतील दोन अशा चार लाख भाविकांना शुद्ध पाण्याचे वाटप करण्याचा संकल्प ‘साईप्रसाद’ने केला. त्यानुसार शनिवारी (ता.7) साईप्रसादची ‘अमृतदिंडी’ 100 स्वयंसेवक आणि 4 ट्रक, 16 टेम्पो, 2 आरओ प्लान्ट, 1 टॅंकर, 4 जिपसह आळंदीला गेलेत. तेथून ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत जाऊन लाखो वारकऱ्यांना शुद्ध थंड पाण्याचे वाटप करीत आहेत.

दररोज सुमारे 40 हजार लिटर शुद्ध पाण्याचे वाटप होत असून, साईप्रसादचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. जेवणाची सोय प्रत्येक दिंडीमध्ये असते; परंतु पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय कुणीच करत नाहीत. अन्नदाते अन्नदान करतात परंतु, अन्नदानामध्ये निर्माण झालेला कचरा साफ करण्याची जबाबदारी घेत नाहीत. अगोदरच पालखीमार्गावर प्रचंड घाण असते त्यामध्ये याची भर पडते. त्यामुळे अन्नदान तर कराच, परंतु पालखी मार्गावर स्वच्छ राहील याचीही काळजी अन्नदात्यांनी घ्यायला
पाहिजे. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी वारकऱ्यांना कसे देता येईल, याचाही पुढील वारीमध्ये दात्यांनी विचार करावा, असे आवाहन ‘साईप्रसाद’तर्फे करण्यात आले आहे.

आळंदी ते पंढरपुर पालखीमार्गावर जिल्ह्यातील अनेक लोकांकडून अन्नदानचे
वाटप दरवर्षी करण्यात येते. अन्नदान करण्यापेक्षा वारकऱ्यांना
वारीदरम्यान शुद्ध पाण्याचे वाटप केले तर वारकऱ्यांची सर्वात महत्त्वाची
गरज भागवण्यास मदत होईल. कारण, प्रत्येक दिंडीमध्ये जेवणाची सोय असते;
परंतु शुद्ध पाण्याची सोय नसते. शिवाय मुक्कामाच्या ठिकाणीही
गावकऱ्यांतर्फे, देवस्थानांतर्फे जेवणाची सोय होत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com