दाते पंचांगला समन्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध या महापुरुषांचा जयंती दिन अशुभ दिवस दाखवून बदनामी केली असा दावा दाते पंचांग विरोधात जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या दाव्यात समन्स जारी करण्यात आल्याची माहिती ऍड. डी. व्ही. खिल्लारे यांनी दिली.

दाते पंचांग पुणे येथून प्रसिद्ध करण्यात येते. पंचांगात महापुरुषांचा जयंती दिन अशुभ दाखविण्यात आला आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन "वर्ज्य दिवस' असल्याचे पंचांगात प्रसिद्ध केले आहे. या विरोधात पंचांगाचे संपादक ओम प्रकाश दाते यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात महामानवांच्या बदनामीचा दावा दाखल केला आहे. अखिल भारतीय समता सैनिक दलातर्फे ऍड. डी. व्ही. खिल्लारे, ऍड. बी. एस. गायकवाड, ऍड. राजेश काळे, ऍड. एस. सी. डोंगरे यांच्यासह दहा जणांनी हा दावा दाखल केला आहे. पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे.