असभ्य वर्तन करणाऱ्या संस्थाचालकाला धुतले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

लातूर - येथील नवीन रेणापूर नाका परिसरात असलेल्या एका शाळेच्या संस्थाचालक असलेल्या मुख्याध्यपकास शाळेतील महिला शिक्षकांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी शाळेतील शिक्षक, महिला शिक्षकांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिस घटनास्थळी आलेदेखील; पण कोणीच तक्रार न केल्याने या प्रकरणात गुन्हा मात्र नोंद करण्यात आलेला नाही.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या घटनेचे पडसाद उमटले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी दिले आहेत. येथील नवीन रेणापूर नाका परिसरात असलेल्या शाळेचे संस्थाचालकच याच शाळेचा मुख्याध्यापक आहे. गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील महिला शिक्षकांना व्यवस्थित न बोलणे, असभ्य वर्तन करणे असे प्रकार त्याच्याकडून होत होते. या प्रकाराला शिक्षिकाही कंटाळल्या होत्या. त्यात सोमवारी एका शिक्षिकेला या संस्थाचालकाने रात्री शाळेवर बोलाविले. हा प्रकार या शिक्षिकेच्या पतीस कळाला. मंगळवारी सकाळी शाळा सुरू होताच. या शिक्षिकेचा पती शाळेत गेला. तेथे असलेल्या संस्थाचालकास विचारणा केली. त्यानंतर बाचाबाची झाली. यातच शाळेतील शिक्षक, शिक्षिकांच्या नातेवाइकांनी या संस्थाचालकाला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत चांगलेच धुतले. त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याने शाळा सोडून देण्यात आली. या
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी संबंधितांना ग्रामीण पोलिस ठाण्यात नेले; पण तक्रार दिली गेली नाही. त्यामुळे दोघांचे जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्व साधारणसभेत या घटनेचे पडसाद उमटले. सदस्य युवराज पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या घटनेमुळे बालमनावर परिणाम झाला आहे. शाळा सोडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, असे आदेश श्रीमती कव्हेकर यांनी दिले.

Web Title: Washed school Director the Misbehavior