औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत पाण्याचे 59 कोटी रुपये थकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

औरंगाबाद - औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिकेकडे महावितरणचे वीज बिलाचे 59 कोटी 9 लाख रुपये थकीत आहेत. अनेक वेळा सूचना, नोटिसा देऊनही वीज बिले न भरल्याने 305 पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. उर्वरित थकबाकीदारांना पैसे भरण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील 228 पाणीपुरवठा योजनांच्या दोन कोटी 87 लाख 58 हजार रुपयांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच 82 पाणीपुरवठा योजनांच्या 10 लाख 7 हजार रुपयांच्या थकबाकीसाठी अनेक वेळा नोटिसा, सूचना देऊनही वीज बिले न भरल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील 77 पाणीपुरवठा योजनांच्या 1 कोटी 51 लाख 6 हजार रुपयांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Web Title: water bill arrears in aurangabad & jalana district