फुलंब्री, खुलताबाद तालुक्‍यांतील 129 गावांमध्ये जलसंधारणाची कामे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा
औरंगाबाद - प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांच्या "पाणी फाउंडेशन'ने वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्ह्यातील फुलंब्री व खुलताबाद या दोन तालुक्‍यांची निवड केली आहे. या दोन्ही तालुक्‍यांतील 129 गावांमध्ये जलसंधारणाची कामे 22 मेपर्यंत होणार आहेत.

फाउंडेशनच्या कामाला गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे शनिवारी (ता. आठ) सुरवात झाली. या वेळी आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी निधी पांडेय, तहसीलदार अरुण जऱ्हाड, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा श्रमदानामध्ये सहभाग होता.

चिंचोली, डोंगरगाव, कवाड, शेलगाव खुर्द, रांजणगाव, वाघोळा यासह फुलंब्री तालुक्‍यातील 92 गावे, तर दरेगाव, कनकशीळा, वेरूळ, चिंचोली, आखातवाडासह खुलताबाद तालुक्‍यातील 37 गावांची पाणी फाउंडेशनने जलसंधारणाच्या कामांसाठी निवड केली आहे.