बीड जिल्ह्यात १४४ प्रकल्पांत ९६.७६ टक्के पाणीसाठा

बीड जिल्ह्यात १४४ प्रकल्पांत ९६.७६ टक्के पाणीसाठा

बीड - जिल्ह्यात एकूण १४४ प्रकल्प आहेत. पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्के इतकाच पाणीसाठा राहिला होता. मात्र, यावर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के पाऊस झाल्याने १४४ पैकी १३२ प्रकल्प तुडुंब भरले असून सर्व प्रकल्पांमध्ये मिळून आजघडीला ९६.७६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाईची चिंता मिटल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.

जिल्ह्यात माजलगाव व मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. याशिवाय १६ मध्यम, तर १२६ लघुप्रकल्प असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. यापैकी माजलगाव व मांजरा हे दोन मोठे, महासांगवी, कडा, बिंदुसरा, सिंदफणा, बेलपारा, तलवार, कांबळी, रूटी, कडी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका आदी १५ मध्यम प्रकल्प भरले असून तब्बल ११५ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ११४०.२५ दलघमी इतकी आहे. यापैकी ८९१.५६ इतका एकूण उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाणी साठवण क्षमतेच्या तुलनेत आजघडीला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ११०७.४७ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ८६२.६३ दलघमी म्हणजेच ९६.७६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. 

जिल्हा गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणी पुरविण्यात येत होते. यावर्षीच्या पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यातील टॅंकर संख्या तब्बल हजाराच्या घरात गेली होती; मात्र यावर्षी दमदार पाऊस झाला. त्यात २४ सप्टेंबर ते ५ ऑक्‍टोबरदरम्यान जिल्ह्यात दोनदा अतिवृष्टी झाल्याने सर्व तलाव तुडुंब भरले असून नद्या-नाले आजही वाहत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत भूजल पातळी साडेचार मीटरने वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com