अबब..फ्लिपकार्टवरून ऑनलाइन मागवली शस्त्रे!

मनोज साखरे
मंगळवार, 29 मे 2018

या तलवारींची खरेदी फ्लिफकार्टवरून ऑनलाईन झाली असून बारा तलवारी, तेरा चाकू, एक गुप्ती आदी हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांच्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून अजून काही तपशील पोलिसांच्या हाती लागेल असेही सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शस्त्रे मागवून ती बाळगणाऱ्यावर नागेश्वरवाडी व मुकुंडवाडीतील जय भवानी चौक येथे छापे घालून गुन्हे शाखेने तलवारीचा साठा जप्त केला. हि कारवाई सोमवारी (ता. 28) रात्री करण्यात आली.

यात पोलिसांनी सुमारे दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सूरु असल्याचे पोलिस दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

या तलवारींची खरेदी फ्लिफकार्टवरून ऑनलाईन झाली असून बारा तलवारी, तेरा चाकू, एक गुप्ती आदी हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांच्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून अजून काही तपशील पोलिसांच्या हाती लागेल असेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: weapons purchase on flipcart website

टॅग्स