आठवडाभरात ६३६ टन भाजीपाल्याची थेट विक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

शेतकरी गटांनी व कंपन्यांनी भाजीपाला थेट विक्री केल्याने ग्राहकांची पिळवणूक थांबण्याबरोबरच शेतकऱ्यांचाही फायदा झाला. या संपामुळे शेतकऱ्यांना थेट विक्रीचे कौशल्य शिकण्याची संधी मिळाली आहे. त्याचा भविष्यात थेट व्रिकी वाढण्यास मदत होणार आहे.

- अशोक कांबळे, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’

 

देव नदी व्हॅली ॲग्री प्रोड्युसर कंपनीतर्फे थेट विक्री प्रायोगिक पातळीवर सुरूच आहे. परंतु, या संपामुळे आम्हाला अधिक व्यापक प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली. यामुळे अधिक ग्राहक कायमस्वरूपी जोडण्यास मदत झाली आहे.

- अनिल शिंदे, कार्यकारी संचालक, देव नदी व्हॅली ॲग्री प्रोड्युसर कंपनी

नाशिक - अडतदार व व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ‘बंद’नंतर शेतकऱ्यांची कोंडी होईल असे चित्र तयार झाले असतानाच जिल्ह्यातील शेतकरी गट व शेतकरी उत्पादन कंपन्यांनी ही संधी समजून थेट ग्राहकांना शेतमाल विकल्याने ती इष्टापत्ती ठरली आहे. जिल्ह्यातील १३१ शेतकरी गट व कंपन्यांनी मिळून आठवडाभरात नाशिक व मुंबई येथे जवळपास ६३६ टन शेतमाल व भाजीपाल्याच्या १६ हजार ३०० जुड्यांची थेट विक्री केली आहे. या प्रयत्नांना ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला असून, यातून अनेक शेतकरी गटांना कायमस्वरूपी ग्राहकही मिळण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात ‘आत्मा’च्या अंतर्गत एक हजार ६० शेतकरी गट व २९ शेतकरी उत्पादन कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. या गटांना व कंपन्यांना ‘आत्मा’तर्फे थेट मार्केटिंगविषयी मार्गदर्शन केले जाते. त्याचाच एक 

टॅग्स