कोण होणार कारभारी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या 62, तर नऊ पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी सरासरी 70.22 टक्के मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता असून, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरवात होणार आहे. अवघ्या काही तासांत जिल्हा परिषद, पंचायत समितींचे कारभारी कोण राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी 15 लाख 43 हजार 390 मतदारांपैकी 10 लाख 83 हजार 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानुसार गुरुवारी प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी गट आणि गणांची मतमोजणी केली जाणार आहे. प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी आता काही तासांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अटीतटीच्या लढती झालेल्या अनेक उमेदवारांना, तर कोण विजयी होणार का, आपण गुलाल उधाळणार का याचे टेन्शन आले आहे. सध्या मिनी मंत्रालयात आमचीच सत्ता येईल असा दावा सर्वच प्रमुख पक्षांकडून करण्यात येऊन अंदाजसुद्धा बांधण्यात आले आहे. आम्ही विजयी होणार गुलाल उधळण्यासाठी तयार राहा असे मॅसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. 

औरंगाबादेत होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी 
औरंगाबाद तालुक्‍यातील दहा गट आणि 20 गणांची मतमोजणी हडकोतील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. मतमोजणीसाठी 20 टेबल लावण्यात आले आहेत. तसेच दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होईल. सर्वप्रथम गटांची आणि त्यानंतर पंचायत समितींच्या गणांची मतमोजणी करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भारत कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश सोनी, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे, डी. बी. नीलावाड, पल्लवी लिगदे, शिवानंद बिडवे, सारिका कदम यांनी नियोजन केले आहे. 

Web Title: Who will be the rulers