वर्षभरापूर्वी मार्किंग झालेल्या सोळा रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - महापालिका प्रशासनाने जुन्या शहरातील 14 वर्षांपूर्वीच्या शहर विकास योजनेतील 16 रस्ते रुंद करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये सुमारे तीन हजारपेक्षा जास्त मालमत्ता बाधित होण्याची शक्‍यता असून संबंधित मालमत्ताधारकांना प्रशासनाने टीडीआर अथवा एफएसआयच्या स्वरूपात मोबदला देण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिका प्रशासनाने या संभावित बाधितधारकांना त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही केले आहे. 

पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्‍तांनी मोठ्या प्रमाणात पाडापाडी करून अनेक रस्ते रुंद करण्यात आले, मात्र अद्यापही 2002 च्या शहर विकास योजनेतील काही रस्त्यांचे रुंदीकरण बाकी आहे. त्यामुळे प्रशासनाने 16 रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी कार्यवाही सुरू केली आहे. 2002 च्या मंजूर शहर विकास योजनेतील गावठाण हद्दीतील 16 रस्त्यांवर वर्षभरापूर्वीच मार्किंग केले होते. आता या रस्त्यांमध्ये संभावित बाधित मालमत्ताधारकांनी मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सध्या रोख स्वरूपात मोबदला देणे शक्‍य नाही. यामुळे प्रशासनाने टीडीआर किंवा एफएसआयच्या स्वरूपातच मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील बहुतेक मालमत्ता या अंशतः बाधित होणार आहेत. 

हे रस्ते होणार रुंद 
गुलमंडी ते यादगार मंडप ते अंगुरीबाग ते हरी मस्जीद - 18 मीटर 
सुराणा कॉम्प्लेक्‍स ते संस्थान गणपती - 15 मीटर 
पैठण गेट मार्गे महापालिका व्यापारी संकुल ते चुनाभट्टी - 12 मीटर 
काला दरवाजा ते नुरानी मस्जीद मार्गे अग्रसेन भवन मंगल कार्यालय ते औरंगपुरा पोलिस चौकी - 12 मीटर 
रोहिलागल्ली, रंगारगल्लीमार्गे गुलमंडीपर्यंत - 15 मीटर 
सिटी चौक पोलिस स्टेशन ते उत्तम मिठाई भांडार, गुलमंडीपर्यंत - 15 मीटर 
रंगीन गेट ते घासमंडी सराफा रोडपर्यंत - 12 मीटर 
लेबर कॉलनी ते लोटाकारंजा, कब्रस्तान मार्गे लोटाकारंजा मटन मार्केटपर्यंत - 12 मीटर 
हर्षनगर ते मोमीनपुरा - 12 मीटर 
हर्षनगर, लेबर कॉलनी ते भारतीय लॉज, गांधी पुतळा - 12 मीटर 
शहागंज चमन ते संस्थान गणपती मार्गे जाधवमंडी - 12 मीटर 
फाजलपुरा, काचीवाडा ते शहाबाजार - 12 मीटर 
महापालिका शाळा, शहाबाजार ते चंपा मस्जीद चौक - 12 मीटर 
संस्थान गणपतीपासून राजाबाजार चौक, जिन्सी चौक, महापालिका शाळा ते अपेक्‍स हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता - 15 मीटर 
राजाबाजार एकनाथ तेली यांचे घर मार्गे काली मस्जीद, रेंगटीपुरापर्यंत - 9 मीटर 
हरी मस्जीदपासून मोंढा ते चंपा मस्जीद रोडपर्यंत - 15 मीटर