अतिक्रमण हटविण्यास विरोध करत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

अतिक्रमण हटविण्यास विरोध करत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबाद- अतिक्रमण हटविण्यास विरोध करत एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता.17) सायंकाळी जयभवानी नगर भागात घडली. पोलिस, महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अर्नथ टळला.

जयभवानीनगर येथील नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. त्यानंतर महापालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यात झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार दुपारपासून कारवाई सुरू करण्यात आली. मात्र आपले दोन मजली घर वाचविण्यासाठी नाला बाजूने वळविण्यात यावा, अशी मागणी करत एका पन्नासवर्षीय महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व महापालिका कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने महिलेला रोखण्यात आले. शकुंतलाबाई सोळुंके असे महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com