बारावी व्होकेशनल उत्तीर्णांसाठी देवगिरीत गुरुवारी भरती मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

सकाळी साडेआठला उपस्थिती
इच्छुक पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणीक कागदपत्रांसह देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी साडेआठला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी एस. डी. गुंटूरकर यांनी केले.

औरंगाबाद : शिक्षण, उद्योग आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्‍त विद्यमाने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (एचएससी व्होकेशनल) बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) भरती मेळावा आयोजित केला आहे. देवगिरी महाविद्यालयात गुरुवारी (ता. एक) हा मेळावा होईल.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, देवगिरी महाविद्यालय, सीएमआयए, मसिआ, एमसीटीसी, व्यापारी महासंघ, क्रेडाई आणि बोर्ड ऑफ ऍप्रेंटिस (बोट) यांच्यातर्फे भरती मेळावा होत आहे. या प्रकारच्या मेळाव्याचे अकरा वर्षापासून आयोजन केले जाते. देवगिरी महाविद्यालयात गुरुवारी सकाळी नऊपासून ते सायंकाळी पाचदरम्यान मेळावा होईल. एच.एस.सी. व्होकेशनल हा व्यावसायिक अभ्यासक्रम यापूर्वी एमसीव्हीसी या नावाने चालवला जात होता.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 265 विविध कारखाने व आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारीच्या 763 पेक्षा जास्त जागा रिक्‍त असल्याचे बोट कार्यालय मुंबईतर्फे सांगण्यात आले आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, बिडकीन आणि पैठण औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार, खासगी विमा कंपन्या, वीज मंडळ, राज्य परिवहन महामंडळ, वाणिज्य आस्थापना, शॉपिंग मॉल्स्‌, बांधकाम व्यावसायिक, शोरूम, सर्व्हिसिंग सेंटर, हॉटेल्स्‌ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्याकरिता पी. बी. सोळंके, ओ. बी. तोंडारे, एन. के. सर्जे हे संपर्क अधिकारी असतील.

 

मराठवाडा

जालना :  जिल्हा नियोजन समितीसाठी मंगळवारी (ता.22) सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रकिया पाच...

12.48 PM

वाशी : हिंगोली येथून अपहरण करुन आणलेल्या गणेश श्रीकृष्ण शिंदे या सोळावर्षीय युवकाची पारगाव (ता. वाशी) येथील युवक व पोलिसांच्या...

12.27 PM

सेलू : शहरातील शिवाजी नगरात अाजी-माजी नगरसेवकांच्या गटात जुन्या वादावरून आज (मंगळवारी) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास...

12.12 PM