महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह युवकाचा अपघातात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

दौलताबाद - दौलताबाद टी पॉइंटजवळ भीषण अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या सुमारास घडली. दीपक अनिरुद्ध खंदारे (वय 27) व नेहा देवेंद्र काकडे (वय 18) अशी मृतांची नावे आहेत. 

दौलताबाद - दौलताबाद टी पॉइंटजवळ भीषण अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या सुमारास घडली. दीपक अनिरुद्ध खंदारे (वय 27) व नेहा देवेंद्र काकडे (वय 18) अशी मृतांची नावे आहेत. 

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दौलताबाद टी पॉइंटजवळ खुलताबादहून औरंगाबादकडे जाणारी भरधाव दुचाकी (एमएच-12 जेडब्ल्यू-9814) व औरंगाबादहून टापरगावकडे जाणाऱ्या बसची (एमएच-20 बीएल-1751) समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दीपक खंदारे (रा. मेहुणा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) व मिलिंद महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी नेहा देवेंद्र काकडे (वय 18) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. दुचाकी बसमध्ये अडकल्याने दूरपर्यंत फरपटत गेली. दीपकचा मृतदेह टायर व बम्परमध्ये अडकला होता. दौलताबाद ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास निकम व कर्मचारी ए. सी. पगारे, प्रकाश जाधव, अरुण पगारे, विष्णू गायके, नितीन जाधव, राजेंद्र वरपे, एकनाथ गायकवाड यांनी वाहतूक सुरळीत केली. 

दरम्यान, औरंगाबाद ते वेरूळपर्यंतचा महामार्ग अरुंद असून रुंदीकरण करून दुभाजक टाकणे आवश्‍यक आहे.

मराठवाडा

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाथरी : खाजगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर ही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - रेल्वेतील टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (ता. १६) अटक...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017