गंगाखेड येथे युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

दुपारी तीनच्या दरम्यान घरात कोणी नसताना छताचा लोखंडी हुकास रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गंगाखेड : रंगारगल्लीमध्ये राहणाऱ्या पांडुरंग रमेशराव रुद्रवार (वय २३) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २३) घडली आहे.

शहरातील भगवती चौकामध्ये फोटोग्राफरचा व्यवसाय करणारा पांडुरंग रमेशराव रुद्रवार (वय २३) याने राहत्या घरी मंगळवारी (ता. २३) दुपारी तीनच्या दरम्यान घरात कोणी नसताना छताचा लोखंडी हुकास रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्या पाश्चात एक भाऊ, दोन विवाहित बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेची अाकस्मात मुत्यूची नोंद पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. एकाच महिन्यात शहरात आतापर्यंत चार आत्महत्याचा घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.