पडेगावला कारच्या धडकेत मुलगा ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

औरंगाबाद - पडेगावातील पोलिस कॉलनीजवळील रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव कारने दिलेल्या धडकेत सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. 26) दुपारी दीडच्या सुमारास झाला. 

औरंगाबाद - पडेगावातील पोलिस कॉलनीजवळील रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव कारने दिलेल्या धडकेत सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. 26) दुपारी दीडच्या सुमारास झाला. 

अन्सारी इस्तेखार मुख्तार (वय 16, रा. दर्गारोड, कासंबरीनगर, पडेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. इस्तेखार हा गॅस सिलिंडरची पावती घेण्यासाठी दुचाकीने पडेगावकडे जात होता. या वेळी समोरून येणाऱ्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अन्सारीच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ घाटीत दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अन्सारी हा एका वाहनावर क्‍लिनरचे काम करायचा. त्याच्या पश्‍चात आई, वडील, चार भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मुख्तारचे वडील खासगी वाहनचालक आहेत. अपघात घडताच कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी छावणी पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.