तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

औरंगाबाद - लेबर कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. सोमवारी (ता. आठ) सकाळी दहाच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह खोलीत आढळून आला. रमाकांत सीताराम वाढणकर (वय 35, रा. हर्षनगर, लेबर कॉलनी, मूळ रा. नांदेड) असे मृताचे नाव आहे. त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

रविवारी (ता. सात) रात्री रमाकांत याला काही जणांनी घरात शिरून मारहाण केल्याची या परिसरात चर्चा सुरू आहे. मूळचा नांदेड येथील रमाकांत याची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे रमाकांत लेबर कॉलनीत एकटाच राहत होता. सोमवारी (ता. आठ) सकाळी रमाकांत दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा रमाकांतने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ सिटी चौक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी धाव घेत त्याचा मृतदेह तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार जगदीश जैस्वाल हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

कारण अस्पष्ट
रमाकांतच्या शोधात रविवारी रात्री काही जण आले होते. त्या वेळी रमाकांतला मारहाण करण्यात आली. त्यानंतर गळफास देण्यात आला असावा, असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. खोलीच्या छताला हात टेकतील इतके छत खाली आहे. गळफासानंतर त्याचे पाय जमिनीला टेकलेले होते. त्यामुळे नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.